सलग दुसऱ्या दिवशी कारवाई पोलिसांचे ‘मिशन गुटखाबंदी’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पोलिस ठाणे असलेल्या शहरात स्थानिक गुन्हे शाखेकडून सर्चिग

 

अमरावती : ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी ‘मिशन गुटखाबंदी’ हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी, ज्या गावात पोलिस ठाणे आहे, तेथे स्थानिक गुन्हे शाखेकडून सर्चिग मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मालिकेत एलसीबीने २४ जुलै रोजी धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर व वरुड येथे धाड टाकून सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर व सागर हटवार यांच्या पथकाने त्या दोन स्वतंत्र कारवाया केल्या. तळेगाव दशासर येथील वॉर्ड क्रमांक पाच येथील रहिवासी मोहम्मद रिजवान मोहम्मद इकबाल (वय ३२) याच्याकडून सुमारे २६ हजार ४० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, गुटखा जप्त करण्यात आला.

मोहम्मद रिजवान याने आपल्या घरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मूलचंद भांबुरकर यांच्या पथकाने तेथे धाड टाकली.

याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी २४ जुलै रोजी आरोपी मोहम्मद रिजवान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

देशमुखपुरा येथून २९ हजारांचा गुटखा जप्त वरुड येथील देशमुखपुरा भागामध्ये अन्य एक कारवाई करण्यात आली. तेथील योगेश शिवाजीराव अडलक (३१) याच्याकडून पांढऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात असलेला २९ हजार ४९० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी २४ जुलै रोजी आरोपी योगेश अडलकविरूद्ध तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याबाबत गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्त्वात या दोन्ही कारवाया करण्यात आल्या. २३ जुलै रोजीदेखील परतवाड्यातून ४१ हजार रुपयांचा गुटखा एलसीबीने जप्त केला होता. कारवायांमध्ये गती आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013512
error: Content is protected !!