अमरावती : धारणी तालुक्यातील झिल्पी गावातील एक गुराखी मागील चार-पाच दिवसांपासून बेपत्ता झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. पोलिस आणि वनविभागाकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर त्याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झिल्पी नजीकच्या बारूखेडा जंगलात पोलिस व वनविभागाच्या पथकाला आढळून आला.
सूत्रांनुसार, रामसिंह रामचंद्र मावस्कर (३१, झिल्पी) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी संबंधित मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश वनविभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे, या गुराख्याचा मृत्यू नेमका वाघाच्या हल्ल्यात झाला की अन्य कारणामुळे याचा वृत्त लिहिस्तोवर खुलासा झाला नव्हता. याप्रकरणाचा पुढील तपास धारणीचे ठाणेदार अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान, आदिवासी इसम बेपत्ता असल्याच्या चर्चेवर गावकऱ्यांच्या सहाय्याने तीन दिवस वान परिक्षेत्रातील बारूखेडा शोधमोहीम जंगलात राबविण्यात आली होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





