-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्मार्ट/प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनाची सुरवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली.शाहीर धम्मा खडसे यांच्या गीताने आंदोलनाची सुरवात करण्यात आली. या एकदिवसीय धरणे आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ,शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ ,बहुजन समाज पार्टी व इतर पुरोगामी पक्षांनी पाठिंबा दिला.धरणे आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य वक्ते ओमप्रकाश कुटेमाटे, शुभम बाळापुरे,अशोक पाटील इंगळे,बापूराव बाळापुरे, रूपरावजी तिडके ,अशोक कोकाटे ,नारायणराव ठाकरे,राजाभाऊ अमृतकर, राजाभाऊ बोबडे ,सुधीर हरणे, मकबूल खा पठाण ,सिराज खा पठाण ,व काँग्रेस पक्षाचे अंजनगाव शहराध्यक्ष प्रदीप देशमुख , प्रदेश सदस्य विदर्भकुमार बोबडे, विनोद हाडोळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गोंडचोर , सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे,बहुजन समाज पार्टीचे मनोज मेळे यांनी यावेळी धरणे आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला .
धरणे आंदोलनाच्या मागण्या
१)स्मार्ट /प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावणे विना विलंब बंद करा.
२)विजेचे दर कमी करा,भविष्यातील प्रस्थापित दरवाढ थांबवा.
३)शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट मुक्त करा.
४)शेतकऱ्यांचा पीकविमा सरकारी कंपनी मार्फत काढण्यात यावा. व (MSP)कायदा कायदा लागू करा.
५) वृद्ध शेतकरी शेतमजूर निराधार अपंग यांच्या योजनेचे पैसे त्वरित द्या.
६)सरकारी शाळेचे खाजगीकरण बंद करा.
७)जनसुरक्षा कायदा रद्द करा.
या मुख्य मागण्या संदर्भात अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





