“स्वातंत्र्यदिनी सरकार लोकांचं खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतेय”- राज ठाकरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखान्यावरून पोलिसांनी केलेली कथित एकतर्फी कारवाई आणि स्वातंत्र्यदिनाला मांसबंदीवरून सरकारवर टीका केली केली आहे. जाणून, घ्या सविस्तर माहिती

 

 

मुंबई –: स्वातंत्र्यदिनी मांस आणि कत्तलखान्याची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “स्वातंत्र्यदिनी सरकार लोकांचं खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. कोणी काय खावं, हे सरकार ठरवणार का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त मांस आणि कत्तलखान्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेनं दिलेल्या या आदेशानंतर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. आता याच विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “स्वातंत्र्यदिनी मांसावर बंदी का घातली जात आहे? मी माझ्या लोकांना सांगितलं आहे की सर्व चिकन, मटण आणि मासळी विक्रीची दुकाने सुरू ठेवा. कोणावरही कोणतंही बंधन नाही. मला सांगण्यात आलं की हा १९८८ चा कायदा आहे. मला वाटतं स्वातंत्र्यदिनी तुम्ही लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. सरकारला नक्की काय हवं आहे? व्हेज-नॉनव्हेज असा वाद निर्माण करणं चुकीचं आहे. आपण काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगणारे सरकार कोण?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

मंगल प्रभात लोढा हे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री- कबुतरांना खायला देण्यावरील बंदी आणि त्याविरुद्ध जैन समाजानं केलेल्या निषेधांवर राज ठाकरे म्हणाले की, “त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. सरकारला काय हवे आहे, ते मला समजत नाही. आता त्यांनी कबुतरांच्या नावाखाली राजकारण करायला सुरुवात केली आहे. पुढे यात आणखी कोणते प्राणी आणतील, हे मला माहित नाही. मंगल प्रभात लोढा हे केवळ एका समुदायाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहेत. कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत वैद्यकीय तज्ञ सातत्यानं इशारा देत आहेत. धार्मिक आणि भावनिक आधारावर कारवाई करण्याऐवजी सरकारनं हे लक्षात घेतलं पाहिजे.”

नुकसान करणाऱ्यांवरही कारवाई करावी- कबुतरखाना प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पोलीस आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली. ही पक्षपाती कारवाई असल्याचं त्यांनी म्हटलं. “ज्याप्रमाणे पोलिसांनी बुधवारी मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांवर कारवाई केली, त्याचप्रमाणं कबुतरांना कबुतरखान्यापासून दूर ठेवण्यासाठी पालिकेनं बसवलेल्या ताडपत्रीचं जबरदस्तीनं घुसून नुकसान करणाऱ्यांवरही कारवाई करावी. लोक चाकू आणि इतर धारदार वस्तू घेऊन आले. त्यांनी पालिकेनं लावलेल्या ताडपत्रीचं नुकसान केलं. पण, पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. नियमांनुसार कायदा हातात घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलीस एकावर कारवाई करू शकत नाहीत”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013510
error: Content is protected !!