‘निवडणूक आयोग खोट्या आरोपांना घाबरत नाही; राहुल गांधींवर निवडणूक आयोगाचा पलटवार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निवडणूक आयोगासाठी कोणताही विरोधी पक्ष नाही किंवा कोणताही सत्ताधारी पक्ष नाही. सर्व समान आहेत. निवडणूक आयोग संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही, असंही निवडणूक आयुक्त म्हणालेत.

 

 

 

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या आरोपांबाबत निवडणूक आयोग रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय. “भारतीय संविधानानुसार 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि मतदानही केले पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, कायद्यानुसार, प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म निवडणूक आयोगात नोंदणीद्वारे होतो. मग निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा करू शकतो?”, असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित आहेत. ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगासाठी कोणताही विरोधी पक्ष नाही किंवा कोणताही सत्ताधारी पक्ष नाही. सर्व समान आहेत. कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी निवडणूक आयोग आपल्या संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही.

निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात राजकारण : ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले की, मत चोरीसारख्या चुकीच्या शब्दांचा वापर योग्य नाही. देशात भारतीय संविधानाचा अपमान केला जातोय. एसआयआरमध्ये त्रुटी असल्याचं जाणीवपूर्णक सांगितलं जात आहे. बिहारमधील सात कोटी मतदार निवडणूक आयोगाकडे आहेत. मतदार यादीत ज्यांची नावे आहेत, तेच मतदान करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात राजकारण केले जात आहे. जनतेचा अपमान करणे म्हणजे हा संविधानाचा अपमान आहे. ‘गेल्या दोन दशकांपासून जवळजवळ सर्व राजकीय पक्ष मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने बिहारमधून एक विशेष सघन पुनरावृत्ती सुरू केली आहे. SIR प्रक्रियेत सर्व मतदार, बूथ लेव्हल अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांनी नामांकित केलेल्या 1.6 लाख BLA यांनी एकत्रितपणे एक मसुदा यादी तयार केलीय.’ लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटींहून अधिक कर्मचारी, 10 लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट, उमेदवारांचे 20 लाखांहून अधिक मतदान एजंट काम करतात. इतक्या लोकांसमोर इतक्या पारदर्शक प्रक्रियेत कोणत्याही मतदाराचं मत चोरी होऊ शकते का?, असा सवालही निवडणूक आयुक्तांनी उपस्थित केलाय.

जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न : ते म्हणाले की, “जमिनीच्या पातळीवर सर्व मतदार, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व बूथ लेव्हल अधिकारी पारदर्शक पद्धतीने एकत्र काम करीत आहेत. पडताळणी, स्वाक्षरी आणि व्हिडीओ प्रशंसापत्रे देखील देत आहेत.” मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, ही पडताळणी केलेली कागदपत्रे, राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे आणि त्यांनी नियुक्त केलेल्या बीएलओंची ही पडताळणी कागदपत्रे एकतर त्यांच्या स्वतःच्या राज्य पातळीवरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केला जातो ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

राहुल गांधींनी कोणते आरोप केले? : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदान चोरी आणि बनावट मतदार यादीचा आरोप केलाय. त्यांनी मतदार यादीचा काही डेटाही माध्यमांसोबत शेअर केला होता. राहुल गांधी यांनी मतदार यादीत अनियमितता असल्याचा दावा केला होता. त्यांनी कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013510
error: Content is protected !!