-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुका कृषि अधिकारी कार्यालय अंजनगाव सुर्जी मार्फत तालूकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राहुल सातपुते आणि प्रकल्प संचालक आत्मा अर्चना निस्ताने यांच्या संकल्पेनतून सदर कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. निलेश घोडेराव होते तर प्रमुख पाहुणे जिल्हास्तरीय आत्मा समिती अध्यक्ष श्री. नरेंद्र काका शिंगणे,तर जिल्हास्तरीय आत्मा समिती सदस्य श्री. प्रदीपभाऊ येवले, संतोषभाऊ काळे, प्रगतशील शेतकरी महेंद्र दिपटे व अमोल घुरडे होते .तर कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती पुष्पा सोळंके तहसीलदार अंजनगाव व श्री. बोंडे ठाणेदार, पोलिस स्टेशन अंजनगाव सूर्जी होते. तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.मंगेश डगवाल
प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी व डॉ. मयुर लहाने प्राध्यापक होते. त्यांनी विविध रानभाजी बद्दल सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमामध्ये केना, घोळ, तरोटा, सुरण, अंबाडी, करवंद, बांबूची कोंब, उंबर, कुंजर, कर्टूले , कपाळफुटी, इत्यादी रानभाजींचे नमुने प्रदर्शित केले होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. भारती जाधव तालुका कृषि अधिकारी अंजनगाव सूर्जी यांनी केले तर रानभाजी चे आहारातील महत्व डॉ. मंगेश डंगवाल यांनी पटवून दीले .
नरेंद्र काका शिंगने यांनी आहारातील भाज्याचे महत्व दिवसेंदिवस लोप पावत आहे त्यामुळे रानभाज्यांचे सवर्धन करण्याचे अनुषंगाने तसेच आरोग्य, स्वास्थ राखण्याचे दृष्टीने रानभाजी महोत्सव चे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित चित्रकार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धीरज वानखेडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी अंजनगाव सूर्जी कार्यालयातील सर्व कर्मचारी/ अधिकारी यांनी सहकार्य केले.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भेट देऊन रानभाजी बद्दल माहिती जाणून घेतली. कार्यक्रमास तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





