अंजनगाव सुर्जी येथे शांतता समितीची बैठक संपन्न ;गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलिस व प्रशासन सज्ज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी भूषविले. हया बैठकीला तहसीलदार श्रीमती पुष्पा सोळंके (दाभेराव), ठाणेदार सुरज बोंडे, नगरपरिषद उपकार्यकारी अधिकारी गोविंद त्रिपुरारी, दुय्यम ठाणेदार सुरज तेलगोटे, दुय्यम ठाणेदार विनोद धाडसे, दुय्यम ठाणेदार श्रीमती प्रशाली काळे, नायब तहसिलदार काळे , प्रा प्रेमकुमार बोके, पत्रकार अशोक पिंजरकर, पंकज हिरूळकर, सचिन इंगळे, सुनिल माकोडे, महेंद्र भगत,नगरपरिषद सदस्य सचिन जायदे, मास्टर नाझिम यांच्यासह शहरातील पत्रकार, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आपल्या भाषणात गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण
असल्याचे सांगत, समाजातील शांतता व सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या व पोलिसांकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.
बैठकीत गणेश मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले. शांतता क्षेत्रात डीजेचा वापर टाळावा तसेच आवाजाची मर्यादा पाळावी यावर भर देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीच्या शेवटी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, सर्वाच्या सहकार्याने अंजनगाव शहरातील गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुय्यम ठाणेदार विनोद धाडसे यांनी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!