जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग, यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा उघडले 18 दरवाजे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जायकवाडी धरणाच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यानं धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे दरवाजे उघडण्यात आलेत.

 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडत असलेल्या पावसाच्या संतत धारेमुळे जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा उघडण्यात आले. धरणातील पाणीसाठा 95.16% टक्के इतका झाल्याने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारी तीन वाजता पाण्याची आवक 40 हजार 774 क्युसेक इतकी होती. तर विसर्ग 28 हजार 296 क्युसेक वेगाने करण्यात आला. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 31 जुलै रोजी पहिल्यांदा पाणी सोडण्यात आलं होतं. मात्र नंतर पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा दरवाजे उघडण्यात आले.

 

जायकवाडीचे 18 दरवाजे पुन्हा उघडले – गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वच धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. बुधवारी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने गुरुवारी जायकवाडी धरणाचे दरवाजे एकाच मोसमात दुसऱ्यांदा 27 पैकी 18 दरवाजे उघडण्यात आले. गुरुवारी दुपारी तीन वाजता पाण्याची आवक 40 हजार 774 क्युसेक इतकी होती. तर विसर्ग 28 हजार 296 क्युसेक वेगाने करण्यात आला.

 

गोदावरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा – जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95.16% टक्क्यांवर पोहोचला असल्याने गुरुवारी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार गुरुवारी सकाळी 18 दरवाजे उघडण्यात आले होते, त्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. जुलै महिन्यात पाणीसाठा 92 टक्क्यांवर गेल्याने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. सतत होणाऱ्या पावसामुळे आपेगाव, हिरडपुरीसह गोदावरी नदीवरील बंधारे शंभर टक्के भरले आहेत. पाण्याची आवक वाढल्यास बाकीचे दरवाजेही उघडण्यात येऊन विसर्ग वाढवला जाईल अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!