अंजनगाव सुर्जीत पहिल्यांदाच पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

“बीज गोळ्यांपासून सायकल रॅलीपर्यंत… अंजनगाव सुर्जीत हरित गणेशोत्सवाची नवी परंपरा”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पहिल्यांदाच पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांचे गुणांकन विविध हरित उपक्रमांच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामध्ये –

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, थर्मोकॉल विना आरास

फटाकेविना उत्सव साजरा करणे

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ प्रतिकृती व सजावट

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम

इलेक्ट्रिक वाहन व सौरऊर्जेबाबत जनजागृती

सायकल रॅलीचे आयोजन

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम दर्शवणारे देखावे

स्वच्छ भारत अभियान व वातावरण बदलावर आधारित पथनाट्य, चित्रकला व रांगोळी स्पर्धा
अशा उपक्रमांचा समावेश असेल.

याशिवाय प्रत्येक मंडळाने किमान २०० बीज गोळे तयार करून प्रक्षेपित करणे किंवा भारतीय प्रजातींच्या १५ वृक्षांचे बीज संकलन करणे आवश्यक आहे.

स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

प्रथम पारितोषिक : ₹५१,००० व ट्रॉफी

द्वितीय पारितोषिक : ₹३१,००० व ट्रॉफी

तृतीय पारितोषिक : ₹२१,००० व ट्रॉफी

ही स्पर्धा मोफत प्रवेश असलेली असून जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी केले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!