गिरगाव चौपाटीवर गर्दी; विविध मंडळाचे गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात, आणि गुलालाच्या उधळणीत गणेशभक्त बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत.

 

मुंबई : मुंबईकर शनिवारी आपल्या दहा दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटी इथं दाखल झाले. गिरगाव चौपाटी इथं घरगुती लहान आकाराचे आणि सार्वजनिक मंडळाचे मोठे गणपती विसर्जनासाठी येत आहेत. यावेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जय घोषात बापाला मोठ्या भक्ती भावानं निरोप देत आहेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुणराजा देखील हजेरी लावत आहे. विसर्जन मिरवणुकीत वरूण राजानं हजेरी लावली असली तरी कार्यकर्त्यांच्या उत्साह कमी झालेला नाही तर तो अधिकच वाढत आहे.

सार्वजनिक गणपती गिरगाव चौपाटी इथं येण्यास सुरूवात : हात गाडीवरून, आपल्या चार चाकी गाडीतून, गणपती बाप्पाला मांडीवर घेऊन भाविक घरगुती गणपतींना निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहेत. तर, ट्रॉलीवरून सार्वजनिक मंडळाचे गणपती हे गिरगाव चौपाटी इथं दाखल होत आहेत. सध्या सुतारवाडीचा बाप्पा राजा, कामाठीपुरा इथले गणपती गिरगाव चौपाटी इथं दाखल झाले आहेत. यासह मुंबईतील अन्य सार्वजनिक मंडळाचे गणपती देखील गिरगाव चौपाटी इथं विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. गिरगाव चौपाटी परिसरात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाणी आणि बिस्किटाची देखील विविध मंडळांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे.

 

गणेशभक्तांच्या गर्दीनं गिरगाव चौपाटी फुलली : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’, ‘गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला!’ अशा घोषणांनी गिरगाव चौपाटी परिसर दुमदुमून गेला आहे. गिरगाव चौपाटीवर तुपारपर्यंत दोन हजाराहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचे, 87 गौरींचे तर 59 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. सकाळपासून एकूण 2,198 गणेश आणि गौरी मूर्तींचे विसर्जन झालं आहे. मोठ्या गणेश मंडळाच्या मूर्ती मिरवणुकीनं गिरगाव चौपाटीकडं येत असून गणेश भक्तांच्या गर्दीनं गिरगाव चौपाटी परिसर फुलून गेला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!