पालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गणेशोत्सवासाठी (Ganeshutsav) आलेल्या भाविकांसाठी मोफत चहा, नाश्ता, जेवण, पाण्याची सोय करण्यात आली आहे.
ठाणे : आज अनंत चतुर्दशी आहे. सकाळपासून गणेशभक्त गणेश विसर्जनासाठी रस्त्यावर आले आहेत. या सर्वच गणेश भक्तांना मदत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी विसर्जन केंद्रावर मोफत नाष्टा, सरबत, चहा जेवणाची सोय केली आहे. याचा उपयोग देखील गणेशभक्तांना होत असून अशा राजकीय पक्षांच्या स्टॉलची रीघ लागलेली ठाण्यात पाहायला मिळत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका जाहीर होत आहेत, अशावेळी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त सर्वच राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत.
भक्तांना मोफत चहा, पाणी, जेवण : ठाणे शहरात गणपती बाप्पांचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात पार पडले. रोज मोठ्या उत्साहाने गणरायाची पूजा अर्चा करणारे चेहरे आज बाप्पांच्या जाण्याने हिरमुसले होते. तर ठाण्यात राजकीय पक्षांनी भक्तांसाठी मोफत वाहन सुविधा, जेवण आणि नाश्त्याची सोय केली होती.
रोजगार उत्पन्न आणि सुविधांमुळं नागरिकांची चंगळ : एकीकडं जेवण आणि विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळं हे काम करणाऱ्या कामगारांना या निमित्ताने उत्पन्नाचे साधन देखील उपलब्ध झाले आहे. अनेक महिला आणि व्यावसायिकांना या राजकीय सुविधा दिल्यानं फायदा होताना दिसत आहे.
पोलीस आणि स्वयंसेवक यांना मदत : विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावर आले असून त्यांनी प्रशासनाला मदत करत आहेत. त्यांना देखील जेवण, नाष्टा जागेवर दिला जात असून ठाण्यातील खाडी तलाव आणि विसर्जन परिसरात हजारो लोकांना ही सुविधा मिळत आहे. या स्वयंसेवक नागरिकांसोबत वाद्य वाजवणारे वाहन चालक या सर्व नागरिकांना देखील या मोफत सुविधेचा फायदा होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





