पुण्यात वेळेआधी मानाच्या गणपती मंडळाच्या गणरायाचं विसर्जन; लाडक्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्त भावूक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दरवर्षी पुण्यातील मानाचे गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षी 15 तासांहून अधिक वेळ चालते. परंतु यंदा ही मिरवणूक 11 तासांत संपली.

 

 

पुणे : शनिवारी अनंत चतुर्दशीला सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा वेळेच्या आधीच मानाच्या गणपती मंडळांचं विसर्जन झालं. दरवर्षी मानाच्या पाचही गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला जवळपास पंधरा तासांहून अधिक वेळ लागत होता. मात्र यंदा अकरा तासात मानाच्या गणपतीचं विसर्जन झालं.

पुणे पोलिसांनी घेतली होती मंडळांची बैठक : गणेशोत्सव सुरू होण्याआधी शहरातील काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीबाबत आवाज उठवला होता. विसर्जन मिरवणूक लवकर सुरू व्हावी आणि गणेशोत्सव मंडळांनी ढोल ताशा पथकांची संख्या कमी करावी अशी मागणी काही मंडळांनी केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी मंडळांसोबत बैठक घेतली होती. काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेत मंडळांचा वाद मिटवला होता. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी स्वतः पुणे पोलिसांकडं विसर्जन मिरवणुकीबाबत वेळ दिली होती.

 

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचं यंदा 133वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणं यंदा पारंपरिक पद्धतीनं गणरायाची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघाली. अब्दागिरी, मानचिन्हांसह गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वतः आपल्या खांद्यावरून घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. नगारावादन आणि ढोल-ताशा पथक सहभागी होते. यात विष्णू नाद हे शंख वादन करणार पथक या मिरवणुकीचं वैशिष्ट्य होतं. तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी विसर्जन झालं. ही मिरवणूक सुमारे 6 तास 40 मिनिटांनी चालली.

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती : शहरातील मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मंडळाचं यंदा 139 वं वर्ष आहे. सकाळी 9.30 वाजता फुलांनी सजवलेल्या रथातून गुलालाची उधळण करत गुरुजी तालमीच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली. गुलालाची उधळण मंडळाकडून मोठ्या प्रमाणावर होत असते. हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. स्वप्नील आणि सुभाष सरपाले या बंधूनी हा रथ साकारला होता. या रथासोबत नगारा वादन, ढोल-ताशा पथकंही होती. मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाचं दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन झालं. ही मिरवणूक सुमारे 7 तास 5 मिनिट सुरू होती.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळ : पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचं यंदा 125 वं वर्ष आहे. यंदा मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीनं झाली. तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणूक मयूर रथातून निघाली. मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या रथाची उंची 35 फूट इतकी होती. तर हा रथ 16 फूट रुंद आणि 24 फूट लांब होता. मंडळाच्या 125 व्या वर्षानिमित्त महिला व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा आणि ढोल ताशा पथकं सहभागी झाली होती. तुळशीबाग गणपतीचं दुपारी 4 वाजून 59 वाजता विसर्जन झालं. ही मिरवणूक सुमारे 7 तास 29 मिनिट सुरू होती.

मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती मंडळ : केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरूवात झाली. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश होता. तर बिडवे बंधूचे नगारा वादन, इतिहास प्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधी जिर्णोद्धार देखावा साकारण्यात आला होता. केसरीवाडा गणपतीचं विसर्जन 5 वाजून 39 मिनिटांनी विसर्जन झालं. ही मिरवणूक 8 तास 9 मिनिट सुरू होती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!