थिलोरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

थिलोरी (ता. दर्यापूर) : खासदार बळवंत वानखडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय दर्यापूर जि. अमरावती अंतर्गत तालुकास्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चिल्लर येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी ₹१०० लक्षांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बळवंत वानखडे,सुधाकर भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर , सुनील गावंडे , गजानन देवतळे , संजय बेलोकार, सौ. मनीषाताई शशांकराव धर्माळे , गौतम वाकपांजर , रविकुमार वाकपांजर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या विकासकामामुळे शेतकरी व पशुपालकांना दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013508
error: Content is protected !!