-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, स्वच्छ भारत अभियान, ग्रामविकास योजना तसेच गावपातळीवरील प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावागावातील अडचणींवर तातडीने उपाययोजना करून प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशा सूचना आमदार लवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या अडचणी व स्थानिक समस्यांवर विधायक चर्चा झाली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर, जिल्हा समन्वयक प्रदीपभाऊ वडतकर, विधानसभा संघटक मा. बबनराव विल्हेकर, तालुका प्रमुख प्रमोद धनोकार, तालुका संघटक गुणवंत गावंडे, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिरे, सरपंच किशोर टाले (टाकळी),मोहन बायसकर (नरसिंगपूर), शहरप्रमुख गोपाल अग्रवाल, उपशहरप्रमुख दीपक बगाडे, तसेच शिवसेना-युवासेना पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






