-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : येथील नगरपरिषद प्राथमिक विद्यालय (किल्ला शाळा) येथे मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना बोरवेलमधून पाणी मिळत होते. या पाण्याच्या गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागत होते.
विद्यार्थ्यांच्या या अडचणीची दखल घेत दर्यापूर-अंजनगावचे आमदार गजानन लवटे यांनी स्थानिक विकास निधीतून शहानूर धरणातील गोड पाणी या शाळेसाठी उपलब्ध करून दिले.
आमदार लवटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “आवश्यक तांत्रिक काम काही दिवसांत पूर्ण झाल्यानंतर शाळेला शहानूर धरणातील गोड पाणीपुरवठा सुरू होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल.”
या प्रसंगी शिवसेना, युवासेना, काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






