मजुरी चुकवायची की कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या साहेब ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कावली वसाड धामणगाव रेल्वे तालुक्यात सोयाबीन काढणीला मोठ्या प्रमाणात वेग आला असला तरी शेतकऱ्यांच्या हाती या पिकातून काहीही हाती लागलेले नाही. एकरी खर्च १५ ते १६ हजार, तर उत्पादन एक-दोन क्विंटल होत असल्याने तोटा कसा सहन करायचा, याचीच चिंता त्यांना सतावत आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरांची देणी चुकवायची की कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, या विवंचनेत शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निसर्गाने थट्टा चालवली आहे.

साधारणतः एक एकर सोयाबीनचा खर्च १५ ते १६ हजार रुपयांच्या घरात जात असताना मात्र उत्पादन केवळ एक ते दोन क्विंटल हाती येत आहे. ज्या शेतकऱ्याचे सोयाबीन हार्वेस्टरने काढले, त्या सोयाबीनला खासगी बाजारात दलाल अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने मागत आहेत. साधारणतः शेतकऱ्याला पेरणीकरिता शेतीच्या मशागतीसाठी नांगरणी खर्च ८०० रुपये, व्ही-पास ७०० रुपये, रोटाव्हेटर ९०० रुपये असा खर्च होतो. पुरेसे पाणी कोसळल्यानंतर पेरणीपासून सोयाबीन बॅग ३२०० रुपये, पेरणी खर्च ७०० रुपये, खत १५०० ते २००० रुपये,तणनाशक १००० रुपये, कीटकनाशक फवारणी १५०० रुपये असा खर्च येतो. एकरी सोंगणी ३००० रुपये, काढणी किमान ५०० ते १००० रुपये असा खर्च करून एकदाचे एका एकरातील सोयाबीन घरी येते. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामध्ये वाढलेला कचरा कापणी करण्यासाठीही खर्च करावा लागतो.

 

सोयाबीनच्या उताऱ्यात एकरी झाली घट पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. त्यामुळे एकरी उताऱ्यात घट झाली. त्यामुळे दुसरे सोपे आणि स्वस्त पर्यायी पीक कोणते, हे कोडे शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून सुटलेले नाही.

 

चारचाकीची चाके थांबली शेतमाल वाहतुकीच्या भरवशावर परिसरातील अनेक जणांनी मालवाहू चारचाकी बाळगल्या आहेत. परंतु, अजूनपर्यंत चाके ठप्प असल्याचे काही चालकांनी यावेळी सांगितले. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु, शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे.

 

सोयाबीन पिकानंतर कावली परिसरातील अनेक शेतकरी गहू किंवा हरभरा पेरणी करीत असतात. परंतु, सोयाबीन पिकाने दगा दिल्यामुळे येणारा हंगाम कशाच्या भरवशावर करावा, याची चिंता सतावत आहे.

रामेश्वर वाघ, कावली वसाड

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!