नुसते वाचून विज्ञान कसे कळणार? कर्मचाऱ्यांअभावी प्रयोगशाळा भकास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धामणगाव रेल्वे उच्च माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान विषयासाठी प्रयोगशाळा सहायक आणि प्रयोगशाळा परिचर ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.

शासनाच्या २०१३ च्या एका निर्णयामुळे प्रयोगशाळा परिचर हे पद कायमचे बंद केले आहे. यामुळे अनेक प्रयोगशाळा केवळ धूळखात पडून आहेत आणि विद्यार्थ्यांचे आवश्यक प्रात्यक्षिक थांबले आहे. यापूर्वी काही शाळांत ही पदे भरण्यात आली आहेत. मात्र, आता नवीन पद भरले जात नसल्याने अशा शाळांमध्ये विज्ञान शिक्षकांनाच प्रयोगाचे साहित्य हाताळावे लागत आहे. अनेक प्रयोगशाळा केवळ देखावे बनले आहेत. आवश्यक तेवढेच प्रयोग घेतले जातात.

प्रयोगशाळा परिचर पद कायमचे बंद शासनाने सन २०१३ मध्ये घेतलेल्या एका निर्णयानुसार प्रयोगशाळा परिचर हे पद कायमस्वरूपी बंद केले. प्रयोगशाळेची स्वच्छता, साहित्य व्यवस्थित ठेवणे, शिक्षकाला प्रयोगासाठी मदत करणे, अशी अनेक महत्त्वाची कामे परिचर करीत असत.

 

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक सरकारने २०१३ मध्ये परिचरपद बंद करून विज्ञान शिक्षणाचे मोठे नुकसान केले आहे. केवळ इमारत आणि पुस्तके देऊन विज्ञान शिकवले जात नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या रिक्त पदांचा तातडीने गांभीर्याने विचार

शाळांतील प्रयोगशाळा पडल्या पूर्णतः ओस अनेक उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळा असूनही त्या वापरात नाहीत. सहायक आणि परिचरांच्या अभावामुळे कोट्यवधींचे साहित्य तसेच पडून आहे. प्रात्यक्षिके घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

जिल्ह्यात सहायक-परिचराची अनेक पदे रिक्त जिल्ह्यात उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळा सहायक आणि प्रयोगशाळा परिचर यांची काही शाळांतील पदे रिक्त आहेत. यापैकी बहुतांश रिक्त जागा प्रदीर्घ काळापासून भरल्या गेल्या नाहीत.

मुले नुसते वाचून विज्ञान कसे शिकणार?

विज्ञान हा विषय केवळ पुस्तके वाचून किंवा केवळ तोंडी शिकवून आत्मसात करता येत नाही. तो प्रामुख्याने प्रात्यक्षिकांवर आधारित आहे. प्रयोगशाळा सहायक आणि परिचर नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रयोग करणे थांबले आहे.

प्रयोगशाळेत साहित्य नाही, विद्यार्थ्यांनी करावे काय ?

जी काही थोड्या प्रमाणात प्रात्यक्षिके घेतली जातात, त्यासाठी अनेक प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध नाही. जुने साहित्य कालबाह्य झाले आहे, तर नवीन साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिकादरम्यान प्रयोगशाळांमध्ये साहित्यच नसल्याने विद्यार्थी रिकामे राहतात.

 

शाळेत प्रयोगशाळा परिचर हे पद भरले नसल्यामुळे प्रात्यक्षिक होत नाही. भावी पिढीच्या आयुष्यात विज्ञान हा विषय महत्त्वाचा असतानाही शासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने आता तरी लक्ष द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.

भरत जगताप,अध्यक्ष, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!