३० गटांतील मतदार ठरविणार जिल्हा परिषद महिला अध्यक्ष

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मिनीमंत्रालयातील एकूण ५९ गटांपैकी ३० गट महिलांसाठी राखीव

अमरावती जिल्हा परिषदेसाठी गटनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. ५९ पैकी ३० गट महिलेसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे या गटातील विजेत्यापैकी मिनीमंत्रालयाच्या अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. यामुळे उमेदवारी मिळविण्यापासून तर विजय मिळविण्यासाठी ग्रामीण भागात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. झेडपी ग निवडणुकीसाठी उमेदवार निवडतांना राजकीय पक्षाची कसोटी लागणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक २०१७ रोजी झाली होती. जिल्हा परिषदेचे ५९ आणि पंचायत समितीचे ११८ गण निश्चित झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १३ ऑक्टोबर रोजी गट व गणांचे आरक्षण काढण्यात आले. अशातच आगामी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या पदासाठी ३० गटातील महिला स्पर्धेत राहणार आहेत.

तिकिटासाठी वाढली चुरस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या गटातून निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसलेली विविध राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी आपल्या निकटवर्तीयाना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे याकरिता पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी आतापासून मोठी चुरस वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

महिला राखीव गटात चुरस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. या आरक्षण सोडतीत झेडपीच्या ५९ गटांपैकी ३० गट हे एससी, एसटी, ओबीसी, खुला व सर्वसाधारण मिळून महिलासाठी राखीव आहेत.

असे आहेत प्रवर्गनिहाय महिलांसाठी राखीव गट जिल्हा परिषदेच्या नव्या आरक्षणानुसार कांडली, कुहा, हिवरखेड, कुन्हा, नांदगाव पेठ, वलगांव, खोलापूर, वाढोणा रामनाथ, आमला विश्वेश्वर, आणि चिचोंली आदी दहा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत. अनुसुचित जाती महिलेसाठी खल्लार, थिलोरी, भंडारज, येवदा, आसेगाव पूर्णा, खारतळेगाव अशा सहा तर एसटी महिलासाठी राखीव असलेल्या तलई, कलमखार, काटकुंभ, टेम्बरसोंडा, जा मली आर, थामनगाव गढी अशा सहा जागा राखीव आहेत. नामाप्र महिलाकरीता कापूसतळणी, धोतरखेडा, शिंदी बु, नेरपिंगळाई, लोणी, जुना धामनगांव, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर आदी ३० गट महिलासाठी राखीव आहेत.

११८ पंचायत समितीच्या गणातही नव्या समीकरणाला वेग आला आहे. २०१७ नंतर आता निवडणूक होत आहे. झेडपीत २१ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!