वरूड : शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच शेतमालाला चांगला भाव देण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार प्रयत्नशील असल्याचे सभापती नरेंद्र पावडे म्हणाले. स्थानिक बाजार समितीची आमसभा नुकतीच पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
आमसभेला मार्गदर्शक म्हणून माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे, उपसभापती बाबाराव मांगूळकर, सहायक निबंधक डॉ. राहुल चर्जन, संचालक राजेश गांधी, प्रमोद पाटील, सुजित पाटील, वनराज काळे, प्रवीण मानकर, बाबाराव लोखंडे, जाबीर खा जहागीर खा, अंकुश पाटील, नरेंद्र पांडव, अमित कुबडे, प्रशांत पाटील, मुकेश देशमुख, प्रणय सोंडे उपस्थित होते.
सभेत बाजार समितीचा लेखाजोखा सभापती नरेंद्र पावडे यांनी मांडला. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा उद्देश नफा कमावणे नसून बाजार समितीच्या शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी यांचा मेळ घालून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकरी समृद्ध होईल, याचा प्रयत्न करणे होय. शेतकऱ्यांच्या संत्रा, मोसंबी मालाला भाव मिळावा, यासाठी संचालक मंडळाने फ्रुटेक्स कंपनीला आणून डिजिटल लिलावाद्वारे दोन वर्षे शेतकऱ्यांच्या संत्र्याला चांगला भाव मिळवून दिला.
या ठिकाणी धान्य लिलाव होत नसल्यामुळे खेडा खरेदी होऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे तो भाव मिळत नव्हता. त्यामुळे संचालक मंडळाने शेतमाल लिलाव सुरू करून शेतमालाला भाव मिळवून दिला. यावर्षी बाजार समितीला दोन कोटी पंचवीस लाख उत्पन्न झाले, तर एक कोटीच्यावर नफा झाला असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सभेचे संचालन मनोज ढोके यांनी केले. आभार प्रणय सोंडे यांनी मानले. आमसभेला शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी उपास्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





