विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडसर ठरली एसटी बस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

करजगाव :विद्यार्थ्यांसाठी एस. टी. बस ही शिक्षणाची जीवनरेखा ठरलेली असताना, परतवाडा-करजगावमार्गे चांदूरबाजार जाणारी बसफेरी अचानक रस्ता बांधकामाच्या नावावर बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दररोज शाळा आणि महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, ही बसफेरी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा अधिकृत पत्रव्यवहाराशिवाय थांबविण्यात आली. महामंडळाच्या या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना करजगाव, शिरजगाव कसबा, सर्फापूर येथील शाळा गाठण्यासाठी आता

सायकल वा खासगी बस, ऑटोने प्रवास करावा लागत असून, त्याचा  भुर्दड पालकांना सोसावा लागत आहे.

दरम्यान, विभागीय कार्यालयाने करजगाव ग्रामपंचायत कार्यालय पत्रव्यवहार करत अनभिज्ञ असल्याचे दाखवून दिले आहे.

भागीय कार्यालयाने दिलेल्या पत्रात बसथांब्याकरिता चालक-वाहकांना आदेश दिल्याचे नमूद आहे. जे की बसफेरी सुरूच नसून बस थांबायचे आदेश कसे देण्यात आले

खासगी वाहने सुसाट; महामंडळाला मारला लकवा?

खासगी बस, ऑटोरिक्षा याच रस्त्यावर सुसाट सुटत आहेत. फक्त परिवहन महामंडळालाच लकवा मारला गेला काय, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करीत आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे; तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

त्याकरिता पहिली बसफेरी सुरू कराती लागेल, हे अद्याप विभागीय कार्यालयाच्या लक्षात आलेले नाही, असे पत्रातून दिसते. बसफेरी थांबविण्याचे ठोस कारण रस्ता बांधकाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत एस.टी. प्रशासनाकडे त्वरित बसफेरी पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

आम्हाला कुठलेच पत्र प्राप्त झाले नाही. चांदूर बाजार आगाराने बसफेरी बंद केली असून, त्यांना पत्र प्राप्त झाले आहे. रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने बसफेरी बंद करण्यात आली.

जीवन वानखडे, आगारप्रमुख, परतवाडा

 

आम्हाला बसफेरी बंद करण्याबाबत कुठलेच पत्र प्राप्त झाले नाही. आम्ही रस्तापाहणी केली असून, रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्ता सुरळीत झाला की वाहतूक सुरळीत करण्यात येईल.

प्रवीण डायलकर,आगारप्रमुख, चांदूरबाजार

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!