जिल्हा काँग्रेसचे एक पाऊल पुढे आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अर्ज निःशुल्क : दाखल करताना मोजावे लागणार नियोजित शुल्क

 

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच जिल्हा काँग्रेस कमिटीने एक पाऊल पुढे टाकत इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज उपलब्ध करून दिले. ते १५ ऑक्टोबरपासून काँग्रेस भवन व संबंधित तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्याकडे उपलब्ध झाले आहेत.

गत आठवड्यात नगर परिषद व नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले. सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची घोषणा झाली. आता कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना अर्ज निःशुल्क उपलब्ध केले आहेत. अर्ज जमा करताना शुल्क पक्षनिधी स्वरूपात जमा करायचे आहे. हे शुल्क परत मिळणार नाही. एससी, एसटी व महिला गटातील जिल्हा परिषद उमेदवारांना १२५०, खुल्या गटाकरिता २५००, तर खुल्या गणात पंचायत समितीकरिता १५०० व राखीवकरिता ७५० जमा करावे लागणार आहेत.

छाननीनंतर मुलाखती अद्याप निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली नाही. तारीख जाहीर होताच अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत जाहीर केली जाईल. आलेल्या सर्व अर्जाची पक्षाची समिती छाननी करेल. पात्र इच्छुक उमेदवारांच्या पक्षाच्या निवड मंडळामार्फत मुलाखती घेतल्या जातील.

काँग्रेसचा झेंडा फडकेल प्रत्येक सर्कल व प्रभागात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. सुजाण मतदार पुन्हा जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत काँग्रेसला साथ देईल. नगर परिषद व नगरपंचायतीमध्येही काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दावा केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!