मुख्याध्यापक ग्रामसेवकाला ‘शो कॉज’, शिक्षकाचे निलंबन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांची कारवाई

 

अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी मंगळवारी सकाळी १०.३० ते ११ च्या सुमारास मासोद येथील जिल्हा परिषद शाळेला व ग्रामपंचायत कार्यालयात सरप्राइज व्हिजिट दिली. यानंतर एका शिक्षकाचे निलंबन केले, तर मुख्याध्यापक व ग्रामविकास अधिकारी यांना शो कॉज नोटीस बजाविली आहे.

अमरावती पंचायत समिती मासोद येथील शाळेत कार्यरत एक शिक्षक सतत गैरहजर राहणे, शाळेत हजर राहून दैनंदिन शैक्षणिक कार्य जबाबदारीनुसार पार न पाडणे असे गैरवर्तन करीत असल्याची तक्रार काही पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. संजीता महापात्र यांनी १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तक्रार असलेल्या शिक्षकांबाबत विद्यार्थ्यांशी वर्गात जाऊन मनमोकळा संवाद साधला. यादरम्यान एक शिक्षक शाळेत गैरहजर आढळल्याने त्याचे निलंबन केले, तर मुख्याध्यापक व ग्रामविकास अधिकारी हे हजर नसल्याने त्यांना शो कॉज नोटीस बजाविली आहे. मुख्याध्यापक हे शैक्षणिक कामानिमित्त अमरावती येथे असल्याची बाब बुधवारी सुनावणीत निष्पन्न झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

मंगळवारी सकाळी मासोद शाळेला आकस्मिक भेटीत एक शिक्षक व मुख्याध्यापक तसेच ग्रामविकास अधिकारी हजर नसल्याचे आढळून आले. यात कारवाई केली आहे.

संजीता महापात्र, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!