प्रभाग २ मधील सर्व प्लेग्राऊंडची तात्काळ स्वच्छता करा — नागरिकांची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आरोग्य धोक्यात; आठ दिवसांत स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : प्रभाग क्रमांक २ (गणेश नगर) येथील नागरिकांनी परिसरातील सर्व प्लेग्राऊंडची तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी नगर परिषदेकडे केली आहे. या संदर्भात नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रभागातील विविध मैदाने गेल्या काही वर्षांपासून अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहेत. ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा, गांजर गवताची वाढ तसेच साचलेले पाणी यामुळे लहान मुलांना खेळताना अडचणी येत आहेत. या अस्वच्छतेमुळे डास, किडे आणि विषारी सर्पांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांनी दिवाळीपूर्वी स्वच्छता मोहिम राबवून कचरा उचलणे, गवत कापणी व निर्जंतुकीकरणाचे काम आगामी आठ दिवसांत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन उमेश चौखंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी उज्ज्वल काकड, अनिकेत काळे, मंगेश चौखंडे, प्रनव कोल्हे, पंकज हिरूळकर, ओम मानकर, सुशांत चौखंडे, पियुश कोल्हे, पवन ढगे, यश मानकर, सागर येवले, प्रनय कीरकटे व विजय कात्रे उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!