खोडगाव येथे धम्मग्रंथ पठनाचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न; भव्य मिरवणूक, महाभोजनदान आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सोहळ्याची शोभा वाढवली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :  खोडगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षावास निमित्ताने आयोजित धम्मग्रंथ पठनाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते व धम्मप्रचारक राजेश चौरपगार यांच्या मधुर वाणीतून धम्मग्रंथाचे पठन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आणि महापरित्राण पाठ घेण्यात आला. त्यानंतर गावातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

विहाराच्या प्रांगणात आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात समता सैनिक दलाचे केंद्रीय सदस्य प्रा. संजय अभ्यंकर, अस्मिता अभ्यंकर, रमेश सावळे आणि सिध्दार्थ सावळे यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ, साहेबराव सदांशिव, तेजस सोनोने, प्रल्हाद वाघ तसेच मनोज मेळे प्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यात जसापूर, देवगाव, वडाळी, अंतरगाव, बाबरडा, ठोकबर्डा, पांढरी, वाघपूरा आणि जवंजाळपुरा येथील संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

महाभोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सोहळा सर्व धर्मप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013507
error: Content is protected !!