-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील साखरी गावात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने गाव हादरले आहे. साखरी येथील वैष्णवी प्रकाश पवार (वय १३ वर्षे) हिच्यावर माकडाने हल्ला करून गंभीर जखमी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी शेतशिवारात खेळत असताना अचानक माकडाने तिच्यावर झडप घातली व तिच्या पायाला जबर चावा घेतला. या अचानक झालेल्या हल्ल्याने मुलगी बेशुद्ध पडली.
तिला तात्काळ चंद्रपूर (खल्लार) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अमरावती येथील अर्विन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे साखरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात वाढत्या माकडांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गावकऱ्यांनी वनविभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत —
> “वन प्राण्यांच्या हौदोसाला आळा घाला,”
तसेच “जखमी मुलीला तात्काळ आर्थिक मदत द्या,”
अशी मागणी केली आहे.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






