भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघानं २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या रोमांचक उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सनं पराभूत करून पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. महिला संघाच्या विजयानं देशभर उत्साह आणि अभिमानाची लाट पसरली आहे. सध्या संपूर्ण भारतात उत्साहचं वातावरण आहे. आता या महिला क्रिकेट संघानं मोठा विक्रम केल्यानंतर त्यांच्यावर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. भारतीय सेलिब्रिटींनीही टीम इंडियाच्य विजयाबद्दल पोस्ट शेअर करून अभिनंदन केलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ २०२५ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर अनेकजण खुश झाले आहेत. विक्रांत मेस्सी, आयुष्यमान खुराना, रश्मिका मंदान्ना, वरुण धवन, करीना कपूर खान सुनील शेट्टी, ऋषभ शेट्टी यासह अनेकांनी सोशल मीडियाच्या खुशी व्यक्त केली आहे.
ऋषभ शेट्टी : ‘कांतारा चॅप्टर १’च्या यशाचा आनंद घेत असलेला ऋषभ शेट्टी जेव्हा टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला हरवले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. ऋषभनं त्याच्या एक्स हँडलवर लिहिलं, ‘भारतासाठी चांगला क्षण आहे! आमच्या महिला संघानं आयसीसी विश्वचषक एकदिवसीय अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियानं किती जबरदस्त कामगिरी केली आहे! किती शानदार! जेमिमा खेळीला सलाम! काय तू शतक ठोकले आहेस.’
अर्जुन रामपाल : बॉलिवूड स्टार अर्जुन रामपालनेही संपूर्ण दिवस ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा सामना पाहण्यात घालवला आणि संघाचा विजय होताच त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिलं आहे, ‘आम्हाला दररोज असे चेज पाहायला मिळत नाहीत. महिला संघासाठी किती चांगला क्षण, किती भावना, काय महा एपिसोड दाखवला आहे.’
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





