“अधिकाऱ्यांच्या कामकाजावर संशयाचा धुरळा : राजकीय वातावरण तापले”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
नगरपरिषद निवडणूक २०२५ ची रणधुमाळी सुरू होत असतानाच AIMIM चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.

डोंगरदिवे यांनी घराघर संपर्क मोहिमेच्या पुराव्यांची मनमानी तपासणी, दस्तऐवज पडताळणीत पक्षपातीपणा, नामांकन प्रक्रियेत अडथळे आणि प्रचार परवानग्यांवरील अतिरिक्त शुल्क अशा अनेक अनियमिततेचे आरोप केले आहेत.

न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचाही त्यांनी ठोस उल्लेख केला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास ढासळत असल्याचे नमूद केले आहे.

त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि नियमानुसार कार्यवाहीची मागणी केली आहे.

या तक्रारीमुळे अंजनगाव सुर्जीच्या निवडणुकीत नवे वादंग पेटण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!