तीन वर्षांचा नैतिक मृत्यूशी झुंजतोय; ब्लड कॅन्सरवर उपचारांसाठी समाजाच्या मदतीची हाक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबावर दुर्दैवाचा घाला पडला असून, अनिल आठवले यांचा अवघा तीन वर्षांचा मुलगा नैतिक याला ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. गेल्या काही महिन्यांपासून चिमुकला नैतिक या प्राणघातक आजाराशी झुंज देत असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
शासनाच्या आरोग्य योजनांतर्गत रुग्णालयात उपचार मिळत असले तरी कर्करोगावरील महागडी औषधे, वारंवार होणाऱ्या तपासण्या तसेच पूरक उपचारांचा वाढता खर्च कुटुंबाच्या क्षमतेपलीकडे गेला आहे. परिणामी, उपचारांचा संपूर्ण खर्च उचलणे आठवले कुटुंबासाठी कठीण झाले आहे.
वडील अनिल आठवले हे रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई अनिता आठवले यांच्यासह संपूर्ण कुटुंब सध्या चिंतेच्या छायेत आहे. अवघ्या तीन वर्षांच्या वयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या नैतिकची अवस्था पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल, अशी परिस्थिती आहे.
या कठीण प्रसंगी समाजातील दानशूर नागरिक, सामाजिक संस्था आणि संवेदनशील व्यक्तींनी पुढे येऊन या चिमुकल्या जीवासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. आपल्या मुलाचे प्राण वाचावेत, हीच त्यांची एकमेव आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
उपचारासाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी कुटुंबीयांनी खालील बँक खात्याची माहिती दिली आहे.
खातेधारक : अनिता अनिल आठवले
खाते क्रमांक : 713402120000855
IFSC : UBIN0571342
बँक : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा अंजनगाव सुर्जी
(बँकेचा क्यूआर कोड उपलब्ध)

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!