मनपा आयुक्त खोट्या की महापौर ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती प्रतिनिधी : जन्ममृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेत घेतलेली बैठक कोणत्या नियमांच्या आधारे बोलाविली? अशी बैठक त्यांना बोलावता येता का? किंवा मनपा आयुक्तांनी कुणाच्या पत्राच्या आधारावर ही बैठक घेतली, हा प्रशासकीय वादाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी महापौरांच्या पत्रावर ती बैठक बोलाविल्याचे सांगितले तर महापौर श्रीचंद तेजवानी यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्रावरूनच ती बैठक मनपाने बोलाविल्याचे सांगितल्याने आता खोटे कोण बोलते आहे, असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेत जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेचधारेवर धरले, एवढेच नव्हे तर प्रशासनाने बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकाविरुद्ध एफआयआर दाखल करावी, असेसुद्धा आदेश दिले. किरीट सोमय्या यांची ही बैठक चांगलीच गाजली. मात्र ती बैठकत्यांनी कुठल्या नियमाच्या आधारे घेतली हा मुद्दा कळीचा ठरला. ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांनीसुद्धा या विषयाला धरून फेसबुकवर प्रतिक्रिया दिली तर दुसरीकडे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख तसेच माजी खासदार अनंत गुढे यांनीसुद्धा अशा प्रकारच्या बैठका आम्हाला आयोजित करता येईल का, असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांची बैठक कुणाच्या पत्राच्या आधारावर घेतली हे स्पष्ट करणे मनपा प्रशासनासाठी गरजेचे झालेले आहे. तर दुसरीकडे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी ही बैठक किरीट सोमय्या यांच्याच पत्रावरून बोलाविल्याचे सांगितले, तर दुसरीकडे मनपा आयुक्तांनी महापौरांच्या पत्रावरून बैठक बोलाविल्याचे सांगितले. त्यामुळे आता महापौर खोटे बोलतात की मनपा आयुक्त, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

012816
error: Content is protected !!