स्पष्ट वक्ता होते अजितदादा : आ. संजय खोडके

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विधानपरिषदेतील शोक प्रस्तावावर अजितदादांच्या आठवणींना उजाळा

 

अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजादरम्यान विधानपरिषदेच्या सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. आ. संजय खोडके यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देऊन त्यांच्या समवेत असलेल्या आठवणी सभागृहापुढे व्यक्त केल्यात.

 

आ. संजय खोडके यांनी, १९९९ पासून प्रशासकीय सेवेपासून तर आता पर्यंतच्या अजितदादा पवार यांच्या सोबतच्या आपल्या आठवणी मांडत असतांना अनेक आठवणींना उजाळा दिला. एखादा विषय जर आपल्या बुद्धीला पटला नसेल पर त्याविषयीची आपली भूमिका दादा ठामपणे मांडणारे होते. चुकलं तर चुकलं सांगत होते. ते नेहमी सांगायचे की जे मनात आहे ते सांगितलं पाहिजे. त्यांचे राजकारण जवळून पाहिले. व्यक्तशीरपणा, स्पष्टवक्ता, रोखठोक भूमिका व जे काम हाती घेतले.आहे, ते काम पूर्ण करून सामान्य जनतेचं समाधान करणारे असे दादा होते. जर एखाद्याने आपल्याला विश्वासाने कुठली गोष्ट सांगितली असेल तर ती आपल्यापर्यंतच ठेवावी, ही त्यांनी दिलेली शिकवण होती. दादांनी काम करत असतांना पक्ष, जात, धर्म कधीच पाहिला नाही, त्यामुळे दादा जनतेत किती रुजले होते, हे त्यांच्या निधनानंतर अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आज पहिल्यांदा अजितदादा सभागृहात नसल्याचे दुःख व्यक्त करीत आ. संजय खोडके यांनी दादांना अभिप्रेत असणारे निर्णय राज्यशासन घेईल, असा विश्वास देखील आ. संजय खोडके यांनी व्यक्त केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

012816
error: Content is protected !!