मेळघाटात स्वावलंबनाची नवी दिशा : सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक बळ, आमदारांच्या हस्ते धनादेश वितरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-प्रतिनिधी : मेळघाटातील दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून धारणी व चिखलदरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना आर्थिक सहाय्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी मंजूर निधीचे धनादेश व कामगिरीचे प्रमाणपत्र यांचे वितरण आमदार केवलराम काळे यांच्या हस्त करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आमदार काळे यांनी सांगितले की, दुर्गम व आदिवासी पट्ट्यातील युवक-युवतींमध्ये कौशल्य व क्षमता मुबलक आहे; मात्र संधींचा अभाव असल्याने त्यांना योग्य दिशा मिळत नाही. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देऊन स्थानिक स्तरावर उद्योग, सेवा व स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थलांतराची समस्या कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश साखरे,शाखा व्यवस्थापक,सचिन देशमुख प्रकल्प व्यवस्थापन,आकाश खैरकर आमदार पी.ए.श्री राऊत सर,कार्यक्रमाचे संचालन श्री सचिन देशमुख यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रियंका इंगळे . माविंम cmrc मॅनेजर टेंभुरसोंडा धर्मेंद्र यावले, शैलेश म्हाला यांच्यासह विविध बचत गटांच्या महिला सदस्यांची व लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

उपस्थित मान्यवरांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करून निधीचा योग्य वापर करून व्यवसाय यशस्वी करण्याचे आवाहन केले.
मेळघाट परिसरातील तरुणांनी स्वबळावर उभे राहावे, स्थानिक संसाधनांचा उपयोग करून रोजगारनिर्मिती करावी आणि इतरांसाठीही संधी निर्माण करावी, या उद्देशाने असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमामुळे आदिवासी भागात आत्मनिर्भर तेजी नवी आशा निर्माण झाली असून ग्रामीण विकासाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

012816
error: Content is protected !!