“राहुल गांधी हे ‘रणछोड दास’; जे स्वतः निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला…”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रोड शो करण्यासाठी नीमचमध्ये पोहोचले. या जागेवरील भाजपा उमेदवारासाठी त्यांनी मंदसौरमध्ये जाहीर सभा घेतली. शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.”भाजपाचे उमेदवार सुधीर गुप्ता मंदसौर-नीमच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर मीही माझ्या मूळ गावी विदिशामधून निवडणूक लढवत आहे आणि नक्कीच जिंकेन” असं म्हटलं आहे. तसेच जागा बदलल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींना ‘रणछोड दास’ म्हणत टीका केली आहे.

जो नेता स्वतः निवडणूक जिंकू शकत नाही, तो आपल्या पक्षाला निवडणूक जिंकून देऊ शकतो का? धोकादायक खेळ खेळणाऱ्या काँग्रेसला मत देऊन फायदा नाही कारण त्यांची विचारसरणी भारतीय नाही” असंही शिवराज यांनी म्हटलं आहे.

नीमच जिल्ह्यातील जावद विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधीर गुप्ता यांच्यासाठी आयोजित केलेल्या रोड शोमध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल कोणालाही माहिती नाही.”मतदारांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे उमेदवार निवडावे कारण ते विश्वासू आणि देशाच्या विकासासाठी वचनबद्ध आहेत.” भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी मंदसौरमध्ये गुप्ता यांच्यासाठी रोड शोचे नेतृत्व केले आणि धार लोकसभा मतदारसंघातील महू विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवार सावित्री ठाकूर यांच्यासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत जाहीर सभा घेतली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013603
error: Content is protected !!