३.८३ लाख रेशनकार्डधारकांसाठी चार महिन्यांनी साखर झाली गोड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : साखरेची निविदा न झाल्याने जानेवारी महिन्यापासून अंत्योदय कार्डधारकांना साखर मिळाली नव्हती. आता शासनस्तरावर निश्चिती झाल्याने जानेवारी ते मार्च महिन्याची साखर या महिन्यात ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे चार महिन्यांनंतर रेशनची साखर गोड झालेली आहे.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मोफत तांदूळ व गव्हाचे वाटप होत आहे. यामध्ये प्राधान्य ३६४६१० कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ४ किलो तांदूळ व व १ किलो गहू तसेच १,२७,४३५ 1800 अंत्योदय कार्डधारकांना २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळत आहे. याशिवाय अंत्योदय कार्डधारकांना २० रुपये किलोप्रमाणे एक किलो साखरदेखील मिळत आहे.

केंद्र शासनाच्या या योजनेतील साखरेचे वाटप जानेवारी महिन्यापासूनथांबले होते. शिवाय काही रेशन दुकानामध्ये डिसेंबरचेही वाटप झालेले नव्हते. ती साखर आता तालुक्याला पाठविण्यात आलेली आहे. आता जानेवारी ते मार्चपर्यंतचे नियतन प्राप्त झाले व तालुक्यांना साखरेचा पुरवठा झाल्याचे या विभागाने सांगितले.

२० रुपये किलोप्रमाणे मिळणार तीन किलो केंद्र शासनाच्या योजनेत अंत्योदयमधील १,२७,४३५ कार्डधारकांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांकरिता प्रत्येकी तीन किलो साखर मिळणार आहे. २० रुपये किलोप्रमाणे ही साखर रेशन दुकानातून मिळेल,

‘अंत्योदय’चे लाभार्थी अचलपूर तालुक्यात ६५३७, अमरावती ५८६२, अमरावती एफडीओ ७८८२, अंजनगाव सुर्जी ६१४७, चांदूरबाजार ८३०२, चांदूर रेल्वे ४१४५, चिखलदरा २०२९३, दर्यापूर ६३८२, धामणगाव रेल्वे ५३९०, धारणी २५९८२, मोर्शी ८०४६, नांदगाव खंडेश्वर ५२२२, भातकुली ४६६७, तिवसा ४३६४ व वरुड तालुक्यात ८२१४ कार्डधारक आहेत व या ग्राहकांना प्रत्येकी तीन किलो साखर मे महिन्यात मिळेल.

साखरेचे नियतन प्राप्त झाले व तालुकास्तरावर साखरेचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता अंत्योदय कार्डधारकांना जानेवारी ते मार्च महिन्यातील साखर या महिन्यात मिळेल. – निनाद लांडे,जिल्हा पुरवठा अधिकारी

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!