
उत्पादन शुल्क व पोलिसांकडून मागवली माहिती
माहिती अधिकार अधिनियमानुसार केला अर्ज
अमरावती शहरात सुरु असलेल्या सर्व पब, रेस्टारेंट अँड बार यांना देण्यात आलेल्या परवानग्यांचा तपशिलासह नियमावलीची माहिती उत्पादन शुल्क व पोलिसांकडून मागवन्यात आली आहे. यासाठी राहुल माटोडे यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना तर समीर जवंजाळ यांनी पोलीस आयुक्तांना माहिती अधिकार अधिनियमानुसार अर्ज केला आहे.
अमरावती शहरात सुरु झालेल्या किचन ३६५ बडनेरा रोड, एजंट जॅक तापडीया मॉल गोपाल नगर चौक, एम.एच २७ तापडीया मॉल गोपाल नगर चौक, एप. अॅन्ड अबाऊ नेस्ट लेवल मॉल गर्ला चौक, लिवायटेड बियाणी चौक कॅम्प, अॅथेना डागा सफायर कॅम्प या सर्व पब व रेस्टॉरंट बारला उत्पादन शुल्क विभाग पोलीस विभागामार्फत देण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा, डिजे, फ्लोअर डांन्स, लिकर याबाबतची नियमावली तसेच यांच्या वेळेची मर्यादा याबाबतची तपशील नियमावली या माहिती अधिकार अर्जाच्या माध्यमातून मागण्यात आली आहे. सदर अर्ज करण्यासाठी हिंदुत्ववादी-काँग्रेस-भीम ब्रिग्रेडचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सगळ्यांकडे फक्त बारचा परवाना !
शहरातील सर्व बार-पब यांना एकसारखाच परमिट रूममध्ये बसवून मद्य विक्रीचा परवांना आहे. बार मध्ये डान्स फ्लोअर, डीजे, पबची कोणतीच परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभाग देत नाही. अशी प्राथमिक माहिती जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षकांनी दिली असल्याचे माहितीअधिकार अर्जकर्ते राहुल माटोडे व समीर जवंजाळ यांनी सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






