
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी चे ज्येष्ठ पत्रकार दैनिक हिंदुस्थानचे प्रतिनिधी अशोक पिंजरकर यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कृषी पत्रकारितेचा राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुमारे ३० वर्षा पासून कृषी पत्रकारिता करणारे पत्रकार अशोक पिंजरकर यांची राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी या पुरस्कारासाठी अशोक पिंजरकर यांची निवड केली हे येथे उल्लेखनीय आहे.विशेष म्हणजे २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतिने तंटामुक्त पत्रकारितेचा पुरस्कार देऊन पत्रकार अशोक पिंजरकर यांना गौरविण्यात आले. तसेच २०२२ मध्ये एका २२ वर्षीय मुलाला शहानूर नदीत वाहून जातांना अशोक पिंजरकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालुन मुलाला वाचविले होते त्याबद्दल तत्कालीन मंत्री ॲड.यशोमतीताई ठाकुर यांनी पिंजरकर यांचा सत्कार केला होता.तसेच कोरोना काळात अडचणीत असलेल्या मतिमंद, दिव्यांग, निराधार गरजूंना मोफत जेवणाची व्यवस्था केली त्या बद्दल शासनाने व पाॅवर ऑफ मीडियाने सुद्धा पत्रकार अशोक पिंजरकर यांना गौरविले होते.पत्रकार अशोक पिंजरकर यांना माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी राज्य स्तरीय कृषी रत्न पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल दर्यापूर चे विद्यमान आमदार तथा अमरावती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळवंत वानखडे,भारत रत्न राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे माजी आमदार रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक आनंद विशाल , गोफणकार डॉ.रमेश गोटखडे, ठाणेदार प्रकाश अहिरे, विवेक संगई, डॉ. विलास कविटकर, डॉ.अमोल नालट,पावर ऑफ मिडियाचे अध्यक्ष मनोहर मुरकुटे, सुरेश साबळे, सुदेश मोरे प्रवीण भाऊ बोके, अनिल जिंतुरकर, सचिन अब्रूक, जयेंद्र गाडगे, महेंद्र भगत,गजानन चांदुरकर, उमेश काकड, सागर साबळे, सुनील माकोडे, अनंत मोहोड, रवींद्र वानखडे, दिलीप जुनघरे कुशल चौधरी आदी मान्यवर व्यक्तींनी हार्दिक अभिनंदन केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






