कोलम की बासमती? कुठल्या तांदळाला बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

धामणगाव रेल्वे : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव वाढले असून, वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर भर दिसत आहे. अमरावतीच्या धान्य बाजारात डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार ५५ ते ६० रुपये असलेले चिन्नोरचे दर सध्या ७५ ते ७८ रुपये तर जय श्रीराम तांदूळ प्रति किलो आठ रुपयांनी वाढून ६० ते ६४ रुपयांवर गेला आहे. तांदळाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटल १,८०० रुपयांनी वाढले आहेत. जयप्रकाश तांदूळ ८२ ते ८५ रुपये प्रतिकिलो पोहोचला आहे.

व्यापारी काय म्हणतात..?

व्यापारी रवी कुकरेजा म्हणाले की, जय श्रीराम, चिन्नोर, जयप्रकाश, बीपीटी आणि सुवर्णा तांदळाला मागणी आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात भाव वाढले आहेत. तर संतोष मुधडा म्हणाले की, हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे भाव आटोक्यात होते. वाढत्या उन्हामुळे भाव वाढले. चिन्नोरमध्ये १,८०० रुपये तर इतर तांदळामध्ये प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपयांची वाढ झाली. जुन्या तांदळाला जास्त मागणी आहे.

असे आहेत तांदळाचे दर आज अलिबाग बाजार समितीत कोलम तांदळाला सरासरी 1200 रुपये तर मुरुड बाजार समितीत देखील 1200 रुपयांचा दर मिळाला. तर कालची बाजारभाव ची आकडेवारी पाहिली असता पुणे बाजार समिती बासमती तांदळाला सरासरी 9 हजार 800 रुपये, नागपूर बाजार समिती चिनोर तांदळाला क्विंटल मागे सहा हजार शंभर रुपये, पुणे बाजार समितीत कोलम तांदळाला 5900 रुपये, सांगली बाजार समितीत लोकल तांदळाला 5 हजार 250 रुपये, नागपूर बाजार समिती लुचाई तांदळाला 03 हजार 150 रुपये, पुणे बाजार समितीत मसुरा तांदळाला 03 हजार 300 रुपये तर नागपूर बाजार समिती परमल तांदळाला 3 हजार 725 रुपये दर मिळाला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!