राळेगाव येथे धारधार शस्त्राने वार करून छोटु ओंकार याची हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव येथे दिनांक ५/६/२४ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी रवि उर्फ भोला महाजन आणी त्याचा साथीदार मयूर इंगळे यांनी राळेगाव येथील छोटु उर्फ नितेश ओंकार अंदाजे वय ३८ वर्ष .याचा उसनेवारीच्या पैश्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून आरोपी पसार झाले.सदर घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव स्टाफ सह तातडीने घटनास्थळी पोहचुन सदर इसम हा गंभीर जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असलेल्या अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव व तेथून जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले असता यवतमाळ येथे जात असतांना वाटेतच मृत्यू झाला.सदर मृतदेह शवविच्छेदनाकरीता जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.व पुढील तपास पोलीस पो उप नि विशाल बोरकर पो स्टे राळेगाव हे करत असून पळून गेलेल्या आरोपीचा कसून शोध घेणे सुरु आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!