राळेगाव येथे खुनातील दोन्ही आरोपींना राळेगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केली अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव येथे दिनांक ५/६/२४ रोजी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास छोटु ओंकार यांची निघृण हत्या झाली होती.पण खुनातील दोन्ही आरोपी हे पसार झाले होते.पण पसार झालेल्या दोन्ही आरोपींना मात्र राळेगाव पोलिस स्टेशन चे पथक मात्र आरोपीच्या शोधात होते.अशातच आरोपी सावंगी मेघे येथे असल्याची खात्रीलायक व गोपीनीय माहीती मिळतात राळेगाव पोलिस पथक सावंगी मेघे येथे जाऊन सापळा रचून भोला उर्फ रवि अशोक महाजन आणी मयूर विजय इंगळे या दोन्ही आरोपींना अवघ्या ४८ तासात अटक केली.ही कार्यवाही डॉ पवन बन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलिस अधीक्षक, रामेश्वर वेंजणे उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, यांच्य र्मार्गदर्शनाखाली रामकृष्ण जाधव पोलिस निरीक्षक पो.स्टे. राळेगाव, विशाल बोरकर पोलिस उप निरीक्षक पो.स्टे. राळेगाव,पो हवा नितीन गेडाम,ना पो कॉ विशाल कोवे,यांनी अटक करण्याची कार्यवाही चे काम केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!