शिक्षकाच्या विनंती बदल्या करा तसेच इतर मागण्या निकाली काढा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर :  7499602440

 

 

 

 

 

म. रा. प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्ट मंडळाचे यवतमाळ शिईओना निवेदन

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : यवतमाळ म. रा.प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत दिनांक 10 जून रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात याव्या त्याचप्रमाणे इतर प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली,बदल्या विषयाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट भूमिका घेत याबाबत शासनाचे परिपत्रक आल्याशिवाय यावर्षी विनंती बदल्या होणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका घेतली, खनिज कर्म विकास निधीमधून जिल्ह्यामध्ये मानधन तत्वावर लागलेले शिक्षण सेवक शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यातील तीन महिन्याचा पगार अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही. अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या शिक्षकांना शक्य तेवढ्या लवकर पगार देण्यात यावा ही विनंती केली, विश्वकालीन कालावधीमध्ये दोन महिन्याचा वाहतूक भत्ता मुख्याध्यापक यांना अदा करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी यासंदर्भात दिनांक 17 ऑगस्ट 2019 ला पत्र काढलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही ती करण्यात यावी यास इतर मागण्याच्या इतर मागण्याच्या निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षण समितीच्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा नेते नानासाहेब नाकाडे, जिल्हा अध्यक्ष पुंडलिक रेकलवार, जिल्हा अध्यक्ष संदीप मोहाडे, जिल्हा सरचिटणीस प्रफुल फुंडकर, राज्य प्रमुख जुनी पेशन्स आघाडी संजय काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोयर, विलास गुल्हाने, आशन्ना गुंडावार, विजय लांडे ,विजय मलकापूर, समीर डाखोरे ,पुष्पजीत राणे, सुभाष लोहोकरे, विनोद क्षीरसागर ,अनिल टोंचर, गणेश कुभंलकर,गजानन गिरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष पारधी यांनी हि माहिती दिली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!