
चांदूर बाजार : तालुक्यातील खरवाडी येथे मुख्य मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कंत्राटदाराकडून बांधलेल्या पर्यायी पुलावर वळविण्यात आली होती. मंगळवारी तालुक्यात कोसळलेल्या पहिल्याच पावसात हा पर्यायी पूल वाहून गेल्याने चांदूर बाजार-वलगाव-अमरावती मार्गाची वाहतूक पूर्णतः बंद पडली आहे.
दरवर्षी वलगाव मार्गावर असलेल्या खरवाडी येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहते. ते अनेकदा स्थानिक नागरिकांच्या घरांत शिरत होते. पावसाळ्यात तेथील वाहतूकसुद्धा बंद राहत होती. अखेर आ. बच्चू कडू यांचा प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या ठिकाणी उंची वाढवून मोठा पूल बनविला जात आहे. पुलाच्या बांधकामाला कंत्राटदाराकडून वेळाने सुरुवात करण्यात आली. शेजारीच पर्यायी पूल तयार करण्यात आला. मंगळवारी तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यात तो वाहून गेला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






