
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात पावसाळ्यात 96 गावांना पुराच्या पाण्याचा धोका संभवतो त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून या विभागाद्वारे पावसाच्या परिस्थितीत शोध व बचावकार्य संबंधाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध जलाशयात शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा व बचाव तसेच पूर परिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली.
सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित
जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूर परिस्थिती मध्ये सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारी 2024 च्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका व गाव पातळीवर व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






