
जानराव गिरी (उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस)

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
मोबाईल नबंर : 7499602440
अरविंद वाढोणकर (यवतमाळ जिल्हा प्रवक्ते)
मिंलीद ईगोले (यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस)

नंदकुमार गांधी (सहकोषाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस)
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : नुकतीच यवतमाळ जिल्हा जम्बो काँग्रेस कार्यकारणी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल मानकर यांनी जाहीर केली यावेळी राळेगाव तालुक्यातून चार जणांची जिल्हा कार्यकारणीत नियुक्ती करण्यात आली आहे,राळेगाव तालुक्यातून राळेगाव नगरपंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी यांची यवतमाळ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच राळेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे सभापती, मिलिंद इंगोले यांची सुद्धा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ,वसंत जिनिंग चे अध्यक्ष, नंदकुमार गांधी यांची सहकोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, तर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरविंद वाढोणकर यांची यवतमाळ जिल्हा प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. राळेगाव तालुक्याला चार पदे मिळाल्याने मोठाबहुमान प्राप्त झाला आहे त्या मुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ,नवनियुक्त पदाधिकारी यांचे संघटनात्मक कार्य मोठे असल्याने कॉग्रेस पक्षाची तालुक्यातील फळी आणखी मजबूत होणार आहे, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कॉग्रेसने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 51






