मेघ दाटले ; पण बरसलेच नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
 मोबाईल क्रमांक :  7499602440

आकाशाकडे लागल्या नजरा : राळेगाव तालुक्यासह शहरातील शेतकरी चिंतेत
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : आकाशात ढगांची गर्दी तर आहे मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे पावसाची ओढ लागली आहे गेल्यावर्षी पाऊस जेमतेम होता यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे होती पोषक हवामानहि होते मात्र मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पाऊसच गायब झाला आहे, आकाशातील ढगांकडे पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होत आहेत मात्र पाऊस अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे .राळेगाव तालुक्यातील अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही जो आहे त्यात जोर नाही यामुळे शेतीचे कामे खोळंबली आहे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाची सुरुवात लवकर होणार, हवामान अंदाज वाले जे सांगतात ते जवळपास अचूक ठरतात या बातमीने सुखावलेल्या शेतकऱ्याने आपला मोर्चा शेतीकडे वळविला. लगबघीने कामे करून घेतली मात्र आता पावसानेच ओढ दिली राळेगाव परिसरात कपास पिकासह तूर,ज्वारी, सोयाबीन अधिक असते या परिसरात थोडाफार मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनि बियाण्याची लागवड केली मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी दुबार पेरणी करण्याच्या संकटात सापडतो की काय? असे वाटत आहे अधून मधून ढग येतात पण बरसतच नाही, राळेगाव तालुक्यातील जवळ पास सर्व शेतकऱ्यांनी लावन केली आहे मात्र जर दुबार पेरणी झाली तर शेतकरी हा खुपच संकटात सापडु शकतो,
कोल्हा धावलाच नसल्याने पाऊस बरसलाच नाही

आजूबाजूला विजा, हवा तथा पावसाचे वातावरण तयार होऊन ढग पुढे जातात या परिसरात पाहिजे तसा पाऊस सुरू झालेला नाही 20 तारखेला मृग नक्षत्र संपत असून ह्याचे वाहन कोल्हा होते मात्र कोल्हा धावलाच नसल्याने पाऊस बरसलाच नाही 21 तारखेला आदरा नक्षत्र प्रारंभ होईल या नक्षत्राचे मोर वाहन असून मोराने पिसारा फुलवला तर शेतकरी आनंदी होईल मृग नक्षत्रात झालेल्या पेरण्या लाभदायक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज असला तरी बहुतेक कपाशी पेरण्या या लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आता पावसाची गरज आहे शेतकरी आभाळाकडे एकटक डोळे लावून बसला आहे

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013618
error: Content is protected !!