असे चमत्कारिक हनुमान मंदिर, जिथे रोगांपासून मिळते मुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

पंचांगानुसार सध्या जेष्ठ महिना  सुरु आहे आणि या महिन्यात भक्त हनुमानाची पूजा करतात आणि उपवास देखील करतात. ज्येष्ठ महिन्यातील मंगळवार हा बडा मंगल म्हणून ओळखला जातो. या काळात संकटमोचन हनुमानाची पूजा केल्याने दुःख कमी होते आणि सुख-समृद्धीचे  आशीर्वाद मिळतात. अशाच  हनुमानजीच्या एका चमत्कारिक मंदिराविषयी सांगणार आहोत, जेथे असाध्य रोग दूर होतात.

जामसावली मंदिर

पवनपुत्र हनुमानाचे हे चमत्कारिक मंदिर  मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात आहे. जे जामसावली मंदिर म्हणून ओळखले जाते.  सुमारे शंभर वर्षे जुने मंदिर आहे.  हनुमानजीचे हे चमत्कारिक मंदिर 22 एकर जागेवर बांधले आहे. या मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. असे मानले जाते की, या मंदिरात हनुमानाचे दर्शन आणि पूजा केल्याने रोग दूर होतात. जामसावली मंदिरात मंगळवारी आणि शनिवारी अनेक भाविक दर्शनासाठी येतात. जामसावली मंदिरात हनुमा  नजींची मूर्ती एका विशाल पिंपळाच्या झाडाखाली विसावलेल्या अवस्थेत स्थापित आहे. हनुमानाच्या मूर्तीची लांबी सुमारे 18 फूट असून त्याच्या डोक्यावर चांदीचा  मुकुटही आहे. या मूर्तीमध्ये  हनुमानजींच्या नाभीतून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. हा प्रवाह कुठून येतो हे कोणालाच माहीत नाही. या पाण्याचा प्रसाद म्हणून भाविक सेवन केल्याने, सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013618
error: Content is protected !!