चिखली:- अवैध रेतीचे टिप्पर हे बसस्टॉप वरुण भरधाव वेगात टिप्पर चालक चालवत असतांना लोकांना आवाज दिला मात्र चालकाने दुर्लक्ष करत टिप्पर पळविले. त्यामुळे पाठलाग करून टिप्पर आडविल्याने वाद उफाळला आणि वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. त्यात कोणीतरी टिप्पर पेटविल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले हि घटना इसरुळ येथे १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीला घडली.
शासनाने अवैध रेती उपसा करण्यास घातली बंदी
खडकपूर्णा प्रकल्पाचा नदी प्रकल्प हा इसरुळ, चिंचखेड, मंडपगाव, सुलतानपूर या गावातून गेलेला आहे. या नदी पात्रातून मोठया प्रमाणावर रात्रीला बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जातो. या अवैध वाळूची वाहतूक टिप्पर द्वारे चिखली तालुक्यातील इसरुळ गावातून ग्रामीण भागात जिल्हाभर ठिक ठिकाणी केल्या जात आहे. एकीकडे शासनाने अवैध रेती उपसा करण्यास बंदी घातली आहे. मात्र, वाळू माफियांचे बंद काळात अवैध रेती विक्री जोमात सुरू असते. या अवैध रेती विरोधात इसरुळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून निवेदन, तक्रारी, आंदोलन केले.
अपघात होवून अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले
मात्र हप्ते खोरीमुळे प्रशासनाने थातूर मातुर कारवाई करून वाळू माफियांना पाठीशी घातले असल्याने अवैध रेती टिप्पर चालक कोणाचीही पर्वा न करता भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामध्ये अपघात होवून अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. असाच प्रकार १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या इसरुळ येथे बसस्टँड समोर काही तरुण उभे असताना त्यांच्या जवळून एका पाठीमागून एक भरधाव वेगाने अवैध वाळू वाहतुक करणारे टिप्पर जावू लागले. त्यामुळे तरुणांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र टिप्पर चालकाने वाहन थांबविले नसल्याने एकाने टिप्परला दगड मारला आणि थोड्यावेळाने चालक हा परत ४ ते ५ जण सोबत घेवून येवून बसस्टॉप वरील जमलेल्या तरूणा मध्ये बाचाबाची होवून त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उभे टिप्पर पेटवून दिले हा प्रकारामुळे वातावरण चिघळले आणि या घटनेची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार विकास पाटील, दुय्यम ठाणेदार जारवाल पोहेकॉ रामेश्वर आंधळे, येथे धाव घेवुन चिखली नगरपालिका अग्निशामन बोलावून आग विझविली. ही घटना बसस्टॉप वरील सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे. मात्र वृत लीहेपर्यत या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.
या बाबतीत अवैध वाळू व टिप्पर वाहतुकीमुळे आमच्या गावचे नाव जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर रेतीघाटाचा लिलाव करावा जेणे करून अशा घटनांना जनतेला सामोरे जावे लागणार नाही. तसेच स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून द्यावी असे इसरुळ सरपंच तथा सरपंच संघटनचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांनी z24news.dreamhosters.com शी सांगण्यात आले .
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






