
अमरावती : भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार भाग्यश्री देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 43






