

संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
विदर्भ प्रतिनिधी संजयकारवटकर दि19/08/2024 रोजी पोलीस स्टेशन वडकी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पो.स्टे.हद्दीतील देवधरी घाटात आयशर ट्रक क्र. फे MH 40, CD 1204 आणि आयशर ट्रक क्र. MH 18, BG 5197 दोन्ही वाहन ताब्यात घेऊन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यातून साठापुर, राज्य तेलंगाणा येथे 23 नर जातीच्या गोवंशाची कत्तलीकरिता वाहतूक करून नेत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन वडकी 4 आरोपी विरुद्ध गुन्हा रजि. नं. 395/2024 कलम 5, 5(अ), 5(ब), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सह कलम 11(1) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
1) 4,60,000/- रु. की. चे 23 बैल
2) 15,00,000/-रु. की. चे आयशर क्र. MH 40,
CD 1204
3) 15,00,000/-रु. की. चे आयशर क्र. MH 18,
BG 5197
एकूण 34,60,000/- रु. की. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने सर यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी केली आहे..
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






