तहसील कार्यालयातील दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अधिकाऱ्यांचे नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय हे तालुक्यातील महत्त्वाचे कार्यालय असल्याने अनेक नागरिकांचे या कार्यालयात कामानिमित्त वर्दळ असते. कोणतीही योजना म्हटली की तहसिल कार्यालयातुनच कागदपत्रे काढावी लागत असल्याने तहसिल कार्यालयात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातही तहसिल कार्यालयातील काही कर्मचारी कार्यालयाला दांडी मारत असल्याने अनेक सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. आज बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संजय गांधी निराधार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निराधार योजनेत अर्जाचा निपटारा करण्यासाठी बैठक पार पडली. मात्र या महत्त्वाच्या बैठकीत संजय गांधी निराधार विभागातील काही कर्मचारी वेळेवर सुट्टीचा अर्ज टेबलावर ठेऊन निघून गेल्याचे समजते. अनेक लाभार्थी टेबलावर जाऊन कर्मचाऱ्यांची वाट पाहून आल्या पावली परत गेले असे अनेक वेळा कर्मचारी दांडी मारत असल्याने तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांन बद्दल असंतोष निर्माण झाला आहे.

अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात कर्मचारी कामावर न येण्याचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांपासून वाढले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. विविध कामांसाठी तहसिल कार्यालयात तालुक्यातील ग्रामीण भागातुन आलेल्या नागरिकांना कर्मचारी वेळेवर भेटतच नाही. या अनुपस्थित असलेल्यांची तक्रार तालुक्यातील पत्रकार मंडळी जवळ पोहचली. आस्थापना विभागात हजर गैरहजर यांची विचारपूस केली असता आस्थापना विभागातील कर्मचारी यांनी माहिती देण्यास नकार दिला. यावरून तहसिल कार्यालयातील कारभार रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत असुन जिल्हाधिकारी यांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
तहसीलदार पुष्पा सोळंखे यांच्याशी चर्चा केली असता कोणाचेही काम राहिलेले नाहीत. जे काही कर्मचारी नाही त्यांनी तसा सुट्टीचा अर्ज कार्यालयत दिला आहे.

अर्जदाराची प्रतिक्रिया

मी विस दिवसांपुर्वी अंजनगाव तहसिल कार्यालयात सात दोन वरच्या नाव दुरुस्ती साठी अर्ज दिला आहे सात दोन मध्ये विमल किसन येवले लग्नापूर्वीचे नाव दुरुस्ती साठी विमल देविदास घडेकार नाव करण्यासाठी मी बावीस दिवसांपूर्वी तहसिल कार्यालयात चकरा मारत असुन कर्मचारी सततत सुटीवर असल्याने आज पर्यंत माझे काम झाले नाही

अनिल देविदास घडेकार
धनेगाव येथील नागरिक.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013608
error: Content is protected !!