
राजुरा बाजार : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकातील एकाच रात्री पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. वरूड पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.राजुरा बाजार येथे बुधवारी रात्री एकाच वेळी चोरट्यांनी पाच दुकाने फोडून ३ हजार १०० रुपये रोख लंपास केले. यामध्ये किराणा, हार्डवेअर, चहाचे दुकान व दोन पानटपरी यांचा समावेश आहे. अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर एकाच वेळी पाच दुकाने फोडल्याने नागरिकांसह दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचा पंचनामा वरूड पोलिस ठाण्याचे बीट जमादार विनोद पवार यांनी केला. पुढील तपास ठाणेदार अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 44






