आज शहरात कडकडीत बंद..!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

Gadchiroli:- ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुली़ंवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे तसेच आरमोरी येथील एका मुलीवर सुद्धा काही व्यक्तीने अमानवीय कृत्य केले आहे. अशा अमानवीय कृत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

महाविकास आघाडी पक्षीयांच्या बैठकीत एकनिर्णय

मात्र राज्य सरका हे सगळे प्रकरण थांबविण्यात अयशस्वी ठरत असून या असंवेदनशील कृत्याचा आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ दिनांक 24 ऑगस्ट रोजी कोरची शहर कडकडीत बंद करण्याचे आवाहन महाविकास आघाडी तर्फे केले आहे. त्यात आरोपींना कठोर सजा व्हावी यासाठी कोरची तालुक्याका कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून कोरची शहरातील सर्व दुकाने बाजारपेठ बंद राहणार आहे. फक्त आरोग्याशी संबंधित सेवा उपलब्ध असणार आहेत. यात भारतीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, रामसुराम काटेंगे, धनराज मडावी नगरसेवक, चतुर सिद्राम, नगराध्यक्ष हर्षलता6 भैसारे, वासिम शेख, दिलीप मडावी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरद पवार गट), तालुका अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, शिवसेना(उद्धव गट), तालुका अध्यक्ष डॉ.नरेश देशमुख, श्रीराम निंबेकर, गुरूदेव मेश्राम, तसेच महाविकास आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले समर्थन दिले आहे.

FacebookWhatsappInstagramTelegram
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!